पेशवा बाजीराव भारताच्‍या एका महान योद्ध्‍याची अकथित कथा

bazi2राष्ट्रीय: सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन तुमच्यासाठी सादर करत आहे भारतातील एका अपराजित योद्ध्याची/नेत्याची- पेशवा बाजीरावाची महान जीवनगाथा, त्याचा आगळावेगळा जीवनमार्ग, आयुष्याची तत्त्वे, त्याची निष्ठा, त्याच्या धारणा.

बाजीरावासारखा योद्धा असाच जन्माला येत नाही. त्याची आई राधाबाई यांनी त्याला काही तत्वे आणि निष्ठा यांचे बाळकडू पाजून मोठे केले. तर, वडील बाळाजी विश्‍वनाथ यांनी शिकवलेल्या युद्ध कौशल्यातून आयुष्याबद्दलचा एक निडर दृष्टिकोन विकसित झाला. शाहू महाराज्यांच्या दरबारात तो राजकारणाची कला आणि मुत्सद्देगिरी शिकला. या सगळ्यातून पुढे तो मैदाने आणि लोकांची मनेही जिंकू शकला.

पेशवा बाजीरावाचे अल्प मात्र परिणामकारक आयुष्य ही एक रोचक कथा आहे.

प्रतिक्रिया: दानिश खान, ईव्हीपी ऍण्ड बिझनेस हेड, सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन ”पेशवा बाजीरावची प्रेरणादायी आणि चित्तवेधक कथा आजच्या काळात, आपल्या आयुष्यालाही लागू पडते. मातृभूमीबद्दलचे त्याचे प्रेम, आव्हानांना सामोरे जाण्याची त्याची आगळी पद्धत आणि त्याची जडणघडण यातून टीव्हीच्या पडद्यासाठी एक प्रेरणादायी आणि आनंददायी कथा तयार होते. ही कथा प्रत्यक्षात आणण्यात स्पिअर ओरिजिन्सचे संजय वाधवा, निलांजना पुरकायस्थ आणि त्यांच्या तरुण क्रिएटिव्ह टीमसोबत काम करण्याचा आम्हाला आनंद आहे.”

bazi3संजय वाधवा, सीएमडी, स्पिअर ओरिजिन्स ”सोनी टीव्हीसह ‘पेशवा बाजीराव’ ही ऐतिहासिक मालिका सादर करताना आम्हाला फारच आनंद होत आहे. ही मालिका पेशवा बाजीराव या निर्भय आणि धाडसी मराठा योद्धाची जीवनगाथा आहे. पेशवा बाजीरावाचे बालपण ते एक निडर योद्धा या कालखंडावर ही मालिका भर देणार आहे. मालिकेचा सेट, त्यातील कपडेपट, दागिने, शस्त्रास्त्रे अगदी घरांमधील सामानामधून तेव्हाचा काळ दिसेल, याची दक्षता आम्ही घेतली आहे. या मालिकेच्या शुभारंभाबद्दल आम्ही फारच सकारात्मक आहोत आणि प्रेक्षकांना ही मालिका आवडेल, असा स्पिअर ओरिजिन्सला विश्‍वास आहे.”

bazi npबाजीरावची भूमिका साकारणारा रुद्र सोनी म्हणाला, ”पेशवा बाजीराव या महान योद्ध्याची भूमिका साकारताना मला फारच आनंद झाला. या मालिकेचा भाग होणे, हा माझ्यासाठी फार भाग्याचा आणि अभिमानाचा क्षण होता. ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकेत मी छोट्या नानासाहेबांची भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच, बाजीरावाची भूमिका आपण साकारावी, असे मला वाटत होते. पेशवा बाजीराव आणि मराठा वारशाबद्दल सखोल वाचल्यानंतर मी फारच भारावून गेलो आहे.”

राधाबाईंची भूमिका साकारणारी अनुजा साठे म्हणाली, ”बाजीरावाची आई राधाबाईंची भूमिका साकारणे, ही फार मोठी जबाबदारी आहे. या मालिकेतील अस्सलपणा प्रेक्षकांना भावेल, याची मला खात्री आहे. भारतीय टेलिव्हिजनच्या पडद्यावरील सर्वात लक्षवेधक कथेची प्रेक्षक वाट पाहत आहेत आणि त्यासाठी ते उत्सुक आहेत, याचा मला आनंद आहे. पेशवा बाजीराव या अपेक्षा पूर्ण करेल.”

बालाजी विश्‍वनाथच्या भूमिकेतील मनिष वाधवा म्हणाला, ”पेशवा बाजीरावाच्या कथेची भव्यता आणि तिचा आवाका पाहता, बाजीचे पालन करणे आणि त्याला एक निडर योद्धा बनवणे हे मोठे आव्हान होते. या मालिकेसाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहेत. प्रेक्षकही स्वत:ला या मालिकेशी जोडू शकतील, अशी मला आशा आहे.”

पेशवा बाजीराव सुरू होत आहे २३ जानेवारी २०१७ पासून सोमवार ते शुक्रवार, सायंकाळी ७.३० वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर!
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *