मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा ‘यारी दोस्ती’ ५ ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

yari dost

मराठी सिनेसृष्टी आता जसजशी बहरत चालली तसे यात नवनवीन प्रयोगही होताना दिसत आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नव्याकोऱ्या चेहऱ्यांना घेऊन सिनेमा करण्याचा नवा ट्रेंड आता रुजू होताना दिसत आहे. असाच एक किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित ‘यारी दोस्ती’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शांतनु अनंत तांबे लिखित, दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ हा सिनेमा ५ ऑगस्टरोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे दिसत नसले तरीही त्यांच्या मैत्रीचे बंध यात ठळकपणे जाणवत आहेत.

बिपीन शहा मोशन पिक्चर्सच्या भावना बिपीन शहा प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित ‘यारी दोस्ती’ सिनेमातून राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तर ‘माझी शाळा’ या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे मुख्य भूमिकेत दिसेल. आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. यांच्यासोबतच ‘उर्फी’ फेम मिताली मयेकर एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळणार आहे. मैत्रीची नवी परिभाषा सांगणाऱ्या या सिनेमात संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्याही भूमिका पहायला मिळणार आहेत




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *